Sangli Samachar

The Janshakti News

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही - पृथ्वीराज पाटील



सांगली समाचार - दि. १ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे. एक अपवाद वगळता सातत्याने सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे.
सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दीड दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरू आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील सांगलीची लोकसभा निवडणुक लढणार. त्यांनी मोठ्या जनसंपर्कातून चांगली तयारी केली आहे. हे आम्ही प्रदेश कमिटीसमोर यापूर्वी मांडले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा हक्काचा मतदार संघ आहे. 
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील घडामोडीसाठी सांगली काँग्रेसवर अन्याय होता कामा नये. सन २०१९ मध्ये सांगली लोकसभा सीट स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणे ही चूक झाली होती. झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. आगामी निवडणुकीत सांगलीच्या लोकसभेची सीट काँग्रेसनेच लढवली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले आहे. 


मंगळवार दि.५ मार्च रोजी मुंबईत आयोजित बैठकीत आम्ही त्याबाबत अधिक आक्रमक भूमिका मांडू अशीही माहिती त्यांनी दिली आहे. 'महाराष्ट्रातील काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी टिळक भवन(मुंबई) येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीस जिल्ह्यातून आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील,प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत,मी स्वतः, श्रीमती जयश्री पाटील वहिनी, सिकंदर जमादार आणि जिल्ह्य़ातील सर्व फ्रंटलचे, ब्लाॅकचे व सेलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघातील झालेली आमची तयारी आणि विजयाची वाढलेली संधी याबाबत ठामपणे भूमिका मांडणार आहे 'असे पृथ्वीराज म्हणाले.