सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - एकमेकांना भेटणं, एकमेकांशी संवाद साधणं, एकमेकांच्या शारीर हालचालीमधून अनेक गाेष्टी एकमेकांपर्यंत पाेचवणं आणि हे सगळं करत असताना भावना शेअर करणं ही माणसाची मुलभूत गरज आहे. कारण माणून सामाजिक प्राणी आहे. यामुळे माणसाची भावनिक गरज तर पूर्ण हाेतेच.आपल्या अशा प्रत्यक्ष भेटीगाठींमधून आपल्या शरीरात असणाऱ्या 209 साेशल जीन्सचा विकास व्हायला मदत हाेत असते. इंटरनेटच्या माध्यमातून निरनिराळ्या साेशल नेटवकिंग साईटस् अचानक ाेावल्या आणि त्यांचा वापर करणाऱ्याचीं संख्याही झपाट्याने वाढली.याचा पहिला झटका बसला ताे प्रत्यक्ष गाठीभेटींना. काॅलेजमध्ये जाऊन नाहीतर कट्टयावर मित्रमंडळींना भेटण्याची गरज एकदम राेडावली. संवादाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली. याचा परिणाम म्हणून प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या संख्येत घट झाली.
प्रतिकारशक्ती नसेल तर लहान सहान आजारांनाही आपण ताेंड देऊ शकत नाही. ताणतणावांचा मुकाबला करणं अशक्य हाेऊन जातं.ती क्षमताच क्षीण हाेत जाते. याचा परिणाम म्हणजे पित्त, निद्रानाश, डाेकेदुखी, नैराश्य आणि चिडचिड यासारखे त्रास. आता या सगळ्याचा हृदयराेगाशी आणि कर्कराेगाशी संबंध आहे असं मानलं जातंय. साेशल जीन्सचं प्रमाण कमी झालं तर शूद्ध रक्तवाहिन्या आकुंचण्याच प्रमाण वाढायला लागतं.आणि हे प्रमाण जसजसं वाढायला लागतं राेगप्रवण पेशींची संख्या वाढायला लागते.कम्प्यूटर रीलेटेड सिन्ड्राेम्स म्हणजेच सीआरएसबद्दल आपल्याला इतके दिवस माहीत हाेतं पण साेशल नेट्वर्किंग पाठदुखी आणि सांधेदुखी यापेक्षाही गंभीर आजारांना सामाेरे जावे लागणार असे एरीक सिगमन यांनी त्यांच्या शाेधनिबंधात नाेंदवले आहे.
मुळामध्ये आपण नेटवरुन जगभरातल्या लाेकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करताे ते शेअरींगच्या आपल्या मुलभूत भुकेपाेटी.'कनेक्टेड' असणं ही आपली गरज आहे.एकाचवेळी हजाराे लाेकांच्या संपर्कात राहण्याचं थ्रील आणि साेय इंटरनेटमुळे आपल्याला मिळालं आहे. पण सतत ऑनलाइन असण्याच्या नादात आपण एका भल्यामाेठ्या जाळ्याचा भाग बनलाे आहाेत हे आपण विसरताे. खरंच आपली प्रत्यक्ष संवादाची गरज क्षीण झाली आहे का? याहूनही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपल्याला प्रत्यक्ष संवादच साधता येत नाही का? प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी जी काही म्हणून साॅफ्ट स्कील्स लागतात तीच आपण गमावत चाललाे आहाेत का? एकदा स्वतःला हे सगळे प्रश्न विचारा.