Sangli Samachar

The Janshakti News

आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते लक्ष्मी मंदिर चौकात ट्रॅफिक सिग्नलचे भूमिपूजन संपन्न



सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
सांगली - सांगलीच्या विस्तारित भागांपैकी कुपवाडकडे जाणाऱ्या लक्ष्मी मंदिर चौकातील वाढत्या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता होती. या भागातील नागरिकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडे मागणी केलेली होती.
आ. सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीमधून महापालिकेस बारा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातूनच या चौकात बसविण्यात येणाऱ्या ट्रॅफिक सिग्नल कामाचे भूमिपूजन आ. सुधीर दादा गाडगीळ यांनी केले. यावेळी सांगली महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, विद्युत अभियंता अमरसिंह चव्हाण, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, विष्णू माने, प्रशांत पाटील, कल्पना कोळेकर, जमीर रंगरेज, मोहन जाधव तसेच वाहतूक पोलीस अधिकारी व इतर मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते. या चौकातून कुपवाडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यास येत आहे.