सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
सांगली - हॅट्रिकच्या तयारीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले, सांगलीचे विद्यमान खासदार मा. संजय काका पाटील यांनी सांगली समाचार वेब पोर्टलचे मुक्तकंठाने कौतुक केले.
भाजपच्या मेळाव्याच्या निमित्ताने खा. संजयकाकांशी भेट झाली. यावेळी संपादक रमेश सरडे यांनी सांगली समाचार वेब पोर्टल बद्दल माहिती दिली.
खा. संजय काका व सांगली समाचार यांचे जुने नाते... काका तत्कालीन सांगली नगरपालिकेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष असल्यापासूनचे...
तेव्हाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत संजय काकांनी, १९७५ पासून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जुन्या पिढीतील वाचकांशी जोडलेले आपुलकीचे नाते आता, सांगली समाचार नव्या पिढीशी नाळ जोडणाऱ्या वेब पोर्टलच्या निमित्ताने वाचकांशी पुन्हा एकरूप होतो आहे, हे ऐकून वेबपोर्टलचे कौतुक केले. यावेळी भाजप नेते दीपकबाबा शिंदे यांनीही वेब पोर्टल बाबत उत्सुकता दाखवून माहिती घेत कौतुक केले. सांगली समाचार वेब पोर्टल अल्पावधीत लोकप्रिय झाले असून, वाचकांची वाढती संख्या याचे प्रतीक आहे.