मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव याच्या शेतातील अड्ड्यांवर सहा महिन्यांपासून आरोग्याला घातक ठरणार्या ड्रग्जच्या निर्मितीचा उद्योग सुरू होता, अशीही माहिती चौकशीतून पुढे येत आहे.पुणे आणि कुपवाड पोलिसांनी 21 फेब-ुवारी 2024 रोजी कुपवाड येथील स्वामी मळ्यात पत्र्याच्या शेडवजा खोलीवर छापा टाकून सुमारे 300 कोटी रुपये किमतीचा 140 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी मुख्य संशयित आयुब मकानदारसह तीन स्थानिक तस्करांना जेरबंद करण्यात आले. कुपवाड येथील ड्रग्ज तस्करीची शोधपथकांद्वारे पोलखोल सुरू असतानाच मुंबई येथील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी टोळीच्या उलाढालीचा मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाला सुगावा लागला.
कुपवाडपाठोपाठ महिन्यात ड्रग्ज सापडले
मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या पथकाला सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी-डोर्ली रस्त्यालगत इरळी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीतील वासुदेव जाधव याच्या द्राक्षबागेलगत असलेल्या अड्ड्यावरील ड्रग्ज निर्मिती आणि तस्करीचा छडा लागला. पथकाने छापा टाकून सुमारे 254 कोटी रुपये किमतीचा ड्रग्जसाठा हस्तगत केला आहे. कुपवाडपाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
आंतरराष्ट्रीय माफियांचे कनेक्शन
मुंबई पोलिसांनी अड्ड्याचा मालक व मुख्य संशयित वासुदेव लक्ष्मण जाधव (वय 34), प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (35), प्रसाद बाळासाहेब मोहिते (24), विकास महादेव मलमे (25), अविनाश महादेव माळी (28) यांना अटक केली आहे. वासुदेव जाधव याच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करीतील आंतरराष्ट्रीय माफियांसह स्थानिक कनेक्शनही पुढे येत आहे.
बिल्डर, सेलिबि-टींसह उद्योजकांकडूनही खंडणी
ड्रग्ज तस्करीतील माफियांनी यापूर्वी बिल्डर, सेलिबि-टींसह उद्योजक, व्यावसायिकांना धमकावून मोठमोठ्या खंडण्या वसूल केल्याचे त्याच्याविरुध्द मुंबईसह राजस्थान, गुजरात, नवी दिल्ली, हरियानासह पंजाबमध्ये गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे समजते. वासुदेव जाधव याच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीच्याआधारे मुंबई पोलिसांनी राजस्थान, गुजरात तसेच मुंबईतही काही ठिकाणी छापेमारी केली. मुंबईतून चार आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच संशयित असे एकूण 9 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
जाधव याची अल्पावधीतील श्रीमंती