Sangli Samachar

The Janshakti News

अत्याचाराच्या घटनेनंतरही स्पॅनिश महिलेनं घेतली भारताची बाजू; टीकाकारांचे थोडे केली बंद ?



सांगली समाचार- दि. ४ मार्च २०२४
रांची - झारखंडमधील दुमका येथे सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश ट्रॅव्हल ब्लॉगरने भारताची बाजू घेतली आहे. महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर अनेक लोक भारताविरुद्ध बोलत आहेत. अशा परिस्थितीत पीडितेने स्वतः पुढे येऊन अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारत हा एक महान देश असल्याचे सांगताना त्या पिडीत महिलेने म्हटले की, भारत देशाविषयी बोलणे बंद करा कारण जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. या महिलेने सोशल मीडियावर लिहिले आहे की, 'स्पेन असो, ब्राझील, अमेरिका किंवा इतर कोणताही देश, जगातील प्रत्येक देशात अशा घटना घडतात. आम्ही भारतात होतो म्हणून असं झालं म्हणणं बंद करा. सोमवारी मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी पीडितेची भेट घेऊन तिचा जबाब नोंदवला. पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. उर्वरितांच्या शोध सुरू आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले उत्तर

"मुद्दा असा आहे की बलात्कार किंवा दरोडा. तुमच्यावर, तुमच्या भावावर, तुमच्या आईवर, तुमच्या मुलीवर किंवा कोणावरही होऊ शकतो," स्पॅनिश जोडप्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. जगातील कोणताही देशात अशा घटना घडत नाहीत असे नाही. स्पेनमध्येही असे अनेकदा घडले आहे. हे जगभर घडले आहे...स्पेन,ब्राझील,अमेरिका,सर्व देशांमध्ये घडले आहे...म्हणून आपण भारतात आहोत म्हणून हे घडले असे बोलू नका. याशिवाय या जोडप्याने सोशल मीडियावर एका आरोपीचे छायाचित्र पोस्ट केले आणि त्याला शोधण्यात त्यांना आणि पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की भारत एक 'महान आणि भेट देण्यालायक देश' आहे. प्रशासनाच्या सर्व सहकार्याबद्दल त्यांचे आभार.



न्यायाधीशांनी घेतली पीडितेची भेट

दुमकाचे प्रधान जिल्हा न्यायाधीश (पीडीजे) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी दुमका येथे सात जणांनी सामूहिक बलात्कार केलेल्या स्पॅनिश जोडप्याची भेट घेतली. त्यांनी या संदर्भात झारखंड विधी सेवा प्राधिकरणकडे अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालात मिश्रा म्हणाले की, त्यांच्या टीमने तपास सुरू असताना पिडीत महिलेला पुरेशी सुरक्षा मिळेल. पीडीजे टीमने त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अंतर्गत त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास मदत केली आणि झारखंड पोलिसांनी त्यांना 10 लाख रुपयांची भरपाई दिली आहे. दुमका न्यायाधीशांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, (आम्ही) त्यांना आश्वासन दिले की चुकीचे कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पीडित तरुणी भावनिकदृष्ट्या खचली असली तरी तिची शारीरिक स्थिती स्थिर असून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.


पोलिसांनी १० लाखांची भरपाई दिली

दुमका येथील एका परदेशी महिलेच्या पतीला पोलीस उपायुक्तांनी नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये सुपूर्द केले आहेत. पोलिसांनी तपास लवकर पूर्ण केल्याबद्दल पतीने त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या पतीसोबत बाईक टूरवर गेलेल्या स्पॅनिश महिलेवर राज्याची राजधानी रांचीपासून सुमारे 300 किमी अंतरावर सामूहिक बलात्कार करण्यात आला, जिथे ती तिच्या पतीसोबत एका तंबूत रात्र थांबली होती, असे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या पतीने नुकसान भरपाई स्वीकारली आणि या प्रकरणाचा तातडीने तपास केल्याबद्दल राज्य पोलिसांचे आभार मानले. तो म्हणाला, 'खूप लवकर तपास केल्याबद्दल धन्यवाद.'

या गुन्ह्यात सात जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.मंगळवारी हे जोडपे पोलिसांच्या बंदोबस्तात दुमका सोडणार असल्याचे उपायुक्तांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले, 'त्यांना हवी ती मदत आम्ही द्यायला तयार आहोत.' 28 वर्षीय महिला आणि तिचा 64 वर्षीय पती बांगलादेशातून दोन बाइकवरून दुमका येथे पोहोचले होते. बिहारमार्गे नेपाळला जात असल्याने त्याला पुढे बिहारमधील भागलपूरला जावे लागले. हे जोडपे टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते.