सन्माननीय पालक बंधू भगिनी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रहो...
सांगली समाचार पोर्टलवर आपले सहर्ष स्वागत !...
सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आणि परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्यापेक्षा पालकांना अधिक तणाव येत असतो. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ही परीक्षा..
कारण इथूनच सुरू होतो नवा शैक्षणिक प्रवास. हा प्रवास सुखकर होण्यासाठी या परीक्षेत उत्तम गुणांनी पास व्हावं, ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु या परीक्षेबरोबरच गरजेचं असतं, आपल्या मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित असणं...
म्हणूनच हा अंक या दृष्टीने मार्गदर्शक-दीपस्तंभ ठरावा. जो प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालकांनी वाचावा आणि त्याचे मनन चिंतन करावे ही अपेक्षा...
दहावी आणि बारावीतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना तसेच पालकांना परीक्षेनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
आता थोडंसं तांत्रिक बाबींबद्दल...
खालील लिंकवर क्लिक करून आपण हा (फ्लिपबुक) अंक ओपन करावा...
अंकाचे मुखपृष्ठ आपणासमोर येईल. त्यानंतर पुढील पानावर जाण्यासाठी आपण नेहमी पुस्तकाची पाने कशी उलघडतो, तशीच यातील पानेही पलटावीत...
दुसरं म्हणजे, अंक वाचण्यासाठी आपण पान झूम करून आपल्या सोयीनुसार लहान-मोठे करू शकता...
पण पुढील पानावर जाण्यासाठी समोर असलेल्या पानावर दोनदा क्लिक करावे लागेल !...
एक आवाहन...
मोफत असलेले हे फ्लिप बुक आपण पुढे सर्व सोशल मीडियावर किमान एका मित्रास पाठवावे...
पुनश्च धन्यवाद !...
आपला नम्र
✒️ *रमेश नेमिनाथ सरडे*
संघटक-समन्वक,
द बेस्ट ब्रेन, सांगली.
🙏🙏🙏🍁😊😊😊