yuva MAharashtra 'ते' पंचामृत आणि आताचं पंचामृत हे स्क्रीप्टेड - पटोले

'ते' पंचामृत आणि आताचं पंचामृत हे स्क्रीप्टेड - पटोले



सांगली समाचार  दि. १ मार्च २०२४
मुंबई  - हे बजेट या राज्यामधील लोकांच्या तोंडाला पानं पुसणारं झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फडणवीसांच्या मागील भाषणात आणि अजित पवारांच्या भाषणात काहीही फरक नाही. त्यामुळे ते फडणवीसांचं पंचामृत आणि आताचं पंचामृत हे स्क्रीप्टेड वाटतं. असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात म्हटलं आहे.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चेवर बोलताना अंबादान दानवे यांनी ताशेरे ओढले. मागच्या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्पाला केंद्राने पंचामृत म्हटले होतं. त्यावरुन त्यांनी अजित पवार यांच्यावर तोंडसुख घेतले "अर्थसंकल्पातून सरकारला काय करायचं, या सगळ्या गोष्टी जनतेला समजत असतात. अर्थसंकल्प राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो. परंतु यावर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणासाठी आहे? सर्वसामान्यांसाठी, बेरोजगारांसाठी आहे काय की, आणखी कशासाठी असा प्रश्न पडतो.

हा अर्थसंकल्प राज्याला डबघाईस घेऊन जाणारा आहे. मागच्या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्पाला केंद्राने पंचामृत म्हटले होतं. पंचामृताला खूप महत्व आहे. या पंचामृतातील एक थेंब तरी पडला का? असा थेट सवाल दानवेंनी पवारांना केला. एकीकडे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे शेतमालाला भाव दिला जात नाही. या दोन हजार रुपयांत काय होणार? तेवढे पैसे तर शेतकऱ्यांना भाड्यालासुद्धा पुरत नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला तर त्यांना अशा मदतीची बिलकूल गरज नाही असेही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

तो डाव आम्ही उधळून लावू-दानवे

राज्याला 7 लाख 82 हजार 981 कोटीं रुपयांच्या कर्जापर्यंत नेण्याचं काम सुरू आहे. या अर्थसंकल्पाचं विश्लेष केलं तर धनगर समाजाला 22 योजना होत्या त्याला निधी दिला नाही. विदर्भ मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली आहे. अनुसुचित जाती जमातीला कमी तरतूद आहे. माहिती आणि जनसंपर्क या विषयावर सर्वाधिक तरतूद केली आहे. राज्याच्या विकासासाठी कुठलीही तरतूद नाही. शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचा डाव सरकारने आखला आहे. मात्र, तो डाव आम्ही उधळून लावू, असा इशारा दानवेंनी अजित पवार यांना दिला.

"लेक लाडकी' योजनेच्या निधीसाठी अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. त्यावर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे, मध्य प्रदेशाच्या धर्तीवर सुरु असलेल्या 'लेक लाडकी' योजनेत महाराष्ट्रातील किती जणांना, किती लेकींना त्यांचा फायदा झाला, हे सरकारने सांगावे. अनेकांना या योजनेचा फायदा मिळाला नाही, योजना राबविणारे आणि मंत्री यांना त्यांचा फायदा झाला. अंगणवाडी सेविकांच्या मागण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे, अशी खंत दानवे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.