Sangli Samachar

The Janshakti News

चंद्राच्या शिवशक्ती'वर उमटली जागतिक मोहर



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिग झाले, त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती असे नामकरण करण्याची घोषणा केली होती. त्यास आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने (आयएयू) मंजुरी दिल्याने 'शिवशक्ती'वर जागतिक मोहोर उमटली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ चे लँडिंग झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लँडिंग साइटला 'शिवशक्ती' म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती. 


- चंद्रयान -२ च्या पाऊलखुणा ज्या बिंदूवर उमटल्या, त्यास 'तिरंगा' असे नाव देण्यात आले. 
- 'शिवा'मध्ये मानवतेच्या कल्याणाचा संकल्प आहे, तर 'शक्ती' ही संकल्पपूर्तीचे सामर्थ्य देते. चंद्राचा हा शिवशक्ती बिंदू हिमालय आणि कन्याकुमारीशी जोडल्याची भावना असल्याचे मोदी यांनी म्हटले होते.