काही लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, एका खास नक्षत्रादरम्यान किंग कोब्रा सापाच्या तोंडात पावसाचे थेंब गेल्यास नागमणि तयार होतो. नागमणि सापाच्या फणात तयार होतो. अशीही धारणा आहे की, साप कधीच नागमणि बाहेर काढत नाही.
Geologyin नुसार, सापांकडे नागमणि असतो यावर फार वाद आहेत. एक्सपर्टनुसार याला काहीच वैज्ञानिक आधार नाही. ही बाब लोककथा आणि अंधविश्वासातून समोर आली आहे.
वैज्ञानिकांनुसार, मनुष्यांप्रमाणे सापांमध्ये पित्ताचे स्टोन होतात. मोठ्या आकाराच्या स्टोनमधून दगडाचे तुकडे निघतात. अशात होऊ शकतं की, सापाच्या शरीरातून स्टोनमुळे तयार होणारा दगड निघाला असेल आणि याला मणि समजण्यात आलं असेल. नंतर हा समज लोकांमध्ये पसरला असेल.
SCI-ART LAB वर प्रकाशित एका रिपोर्टमध्ये डॉ. कृष्णा कुमारी छल्ला यांनीही नागमणि असल्याच्या दाव्याचं खंडन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, नागमणि किंवा वायपर स्टोन किंवा स्नेक पर्ल सारख्या काही गोष्टी नसतात. हे एक प्राण्याचं हाड असतं किंवा चमकदार दगड असतो ज्याचा वापर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत आणि इतर देशांमध्ये सापाने दंश मारल्यावर औषधी म्हणून वापरला जातो. 14व्या शतकापासून ही परंपरा चालत आली आहे आणि लोकांनी याला नागमणि असल्याचं सांगितलं.