yuva MAharashtra चोरी करणाऱ्या तृतियपंथियास अटक, दीड लाखांचे दागिने हस्तगत

चोरी करणाऱ्या तृतियपंथियास अटक, दीड लाखांचे दागिने हस्तगत



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
सांगली - देवाची गाणी म्हणून गुजराण करणाऱ्या तृतियपंथियानेच सोबत्याच्या घरातील सुवर्णलंकार चोरल्याची घटना उघडकीस आली असून मंगळवारी मिरजेत चोरी करणाऱ्या तृतियपंथियास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेले दीड लाखाचे २६ ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले.


विटा येथील जयवंत बागडे याच्यासोबत देवाची गाणी म्हणून कैलास उर्फ कल्याणी जाधव हा तृतियपंथी गुजराण करत होता. त्याने बागडे याच्या घरातून सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संशयित जाधव आज मिरजेत आला असता पोलीसांनी पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये दीड लाखाचे चोरीचे दागिने सापडले.