Sangli Samachar

The Janshakti News

मनाच्या माध्यमातून अखंड भगवत चिंतनाने तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचाल : संजय महाराज कोटणीस



सांगली समाचार- दि. ८ मार्च २०२४
सातारा - जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल भगवंतापर्यंत पोहोचायचे असेल तर, मनाच्या माध्यमातून अखंड चिंतनाने हे शक्य होते असे श्री हरिभक्त परायण संजय महाराज कोटणीस यांनी समर्थ सदन येथे प्रवचनामध्ये सांगितले.

सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दासनवमी महोत्सवामध्ये आपल्या प्रवचनातून उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय कोटणीस म्हणाले की, तू मन हे मी ची करी माझी आई भजनी प्रेम धरी.. सर्वत्र नमस्कार या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील दोन दिवस अखंड चिंतन करत त्यांनी सांगितले की, मनाला मला जर भगवंताच्या नामाची अखंड सवय लावली तर भगवंतापर्यंत लवकर पोहोचता येते.

कलियुगामध्ये नाम हे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे सगळ्यात सोपे मार्ग आहे. अनेक संतांच्या अभंगाचा आधार घेत त्यांनी हे जनमानसात ठसवण्याचा प्रयत्न केला अनेक सोपी उदाहरणे देत नवविधा होऊन जीवनातला खरा आनंद भक्तीचा मागोवा घेत त्यांनी ह्या गोष्टी समोर ठेवल्या व शेवट सांगितले की, ज्या वेळेला मनाच्या माध्यमातून आम्ही प्राप्त करू शकतो असे त्यांनी श्रोत्यांना सांगितले.


अखंड भगवंत चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर, सर्वव्याप्त असणारा भगवान आम्हाला आमच्या हृदयातच प्राप्त होतो. तो प्राप्त करण्यासाठी हे जीवन प्राप्त झालेले आहे. या जीवनामध्ये खरा आनंद मिळवायचा असेल खरे सुख मिळवायचे असेल तर समर्थांच्या सारख्या सद्गुरूंच्या माध्यमातून जो नाम महिमा वर्णन केला जातो, तो अखंड तत्त्वांनी या शरीरामध्ये अखंड चालू ठेवला असता आम्हीही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. व त्याच्या स्वरूपाशी एकरूप होता येते.

प्रवचनमालेनंतर कोटणीस यांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे ज्येष समर्थ भक्त व समर्थ विद्यापीठाचे कुलपती रमेशबुवा शेंबेकर रामदासी यांचे हस्ते करण्यात आला. तब्बल दहा दिवस रंगलेल्या या कीर्तन प्रवचन महोत्सवात अनेक मान्यवरांनी आपली सेवा देत हा महोत्सव उंचीवर नेऊन ठेवला, याबद्दल समर्थ सेवा मंडळाचे वतीने रमेश बुवा शेंबेकर रामदास यांनी सर्वांचे आभार मानले. समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी गुरुजी, समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर, राजू उर्फ मुरलीधर कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, रवीबुवा आचार्य या प्रवचनाच्या माध्यमातून सर्व, संतोष वाघ, सौ. देसाई वहिनी आदींची प्रमुख उपस्थिती होती.