Sangli Samachar

The Janshakti News

वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच"; ठाकरेंच्या शिलेदारांने थेट शाहांनाच दिले चॅलेंज !



सांगली समाचार - ७ मार्च २०२४
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले. व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे, शोभा फडणवीस - देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे, शंकरराव चव्हाण - अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे - संतोष दानवे यांच्याकडे डोळेझाक, कारण ते तुमच्यासोबत... असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

दरम्यान, शिवाय असले काही पक्षही तुमच्यासोबत आहेत. ज्यांचा पायाच एक घराणे आहे.. शिरोमणी अकाली दल (पंजाब) , पासवान परिवार (बिहार), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (महाराष्ट्र) , नॅशनल पीपल्स पार्टी (मेघालय) , जनता दल सेक्युलर (कर्नाटक), राष्ट्रीय लोक दल (उप्र, राजस्थान) अजून बरेच आहेत! या गोष्टी आम्हाला कशाला सांगता.. महाराष्ट्रात ठाकरे घराण्यावर लोकांनी प्रेम केले आहे. जोपर्यंत ठाकरे तुमच्यासोबत तोपर्यंत ते चांगले, आणि विरोधात गेले की घराणेशाहीचा पुरस्कर्ते? ही डबल ढोलकी वाजवणे लोकांना दिसते. हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही.. ध्यानी असू द्या.. आहे! असा इशाराही त्यांनी दिला आहे.


ज्या पक्षांमध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहेत. असे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का असा सवालही त्यांनी केला. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बॅनर्जींना आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे, स्टॅलिन यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. मग सगळ्यांपैकी तुमच्यासाठी कोण आहे ? तुमच्यासाठी कोणी असेल तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. असे अमित शाह यांनी म्हटले होते.

केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले. व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे..

१. शोभा फडणवीस - देवेंद्र फडणवीस
२. गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे
३. शंकरराव चव्हाण -…