सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
मुंबई - राज्य सरकारने दुधाला पाच रुपयांचे अनुदान जाहीर केले, पण एक फुटकी कवडीही शेतकऱयांच्या खात्यात जमा झालेली नाही तरीही 'मार्चअखेर हे अनुदान शेतकऱयांच्या खात्यावर जमा होतील आणि शेतकरी श्रीमंत होतील' अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय फायदा मिळवण्यासाठी ही पोस्ट व्हायरल होत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे, असा आक्षेप किसान विकास सभेने घेतला आहे. त्यामुळे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली.
सोशल मीडियावर फिरणाऱया या व्हायरल पोस्टवर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात अजित नवले म्हणाले की, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पह्टो अससेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा प्रकार शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न आहे. हे पोस्टर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अधिकृतरित्या फिरवले असेल तर हा आचारसंहितेचा भंग आहे. यंत्रणेने आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे.