यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेचा देखील समावेश होतो. एसबीआय ही पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात पर्सनल लोन अर्थातच वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. दरम्यान, आज आपण एसबीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही एसबीआयकडून वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
एसबीआय बँक वैयक्तिक कर्जासाठी किती व्याजदर आकारते
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय बँक वैयक्तिक कर्जासाठी किमान 11.15% एवढे वार्षिक व्याज आकारते. मात्र हा बँकेकडून ऑफर केला जाणारा किमान व्याजदर आहे. याचा लाभ मात्र काही मोजक्याचं ग्राहकांना मिळू शकणार आहे.
कोणाला मिळणार कमी व्याजदरात कर्ज
ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर हा चांगला आहे त्यांना किमान व्याजदरात हे लोन मिळेल. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर 800 च्या जवळपास आहे त्यांनाच या 11.15% किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळू शकणार आहे. पण, सिबिल स्कोर यापेक्षा कमी असेल तर व्याजदर अधिक आकारले जाऊ शकते. यामुळे ग्राहकांनी नेहमीच सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
5 लाखाचे लोन मिळाले तर कितीचा EMI
जर समजा एखाद्या ग्राहकाला 11.15% या किमान व्याजदरात एसबीआय कडून पाच लाख रुपयांचे लोन, 5 वर्षासाठी मिळाले तर त्याला दहा हजार 909 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत एक लाख 54 हजार 519 रुपये एवढे व्याज सदर ग्राहकाला भरावे लागणार आहे. म्हणजेच मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण सहा लाख 54 हजार 519 रुपये सदर ग्राहकाला भरावे लागणार आहेत.