सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
सांगली - घातक शस्त्र हातात घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या दोन तरुणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील राम मंदिर चौकात नितीन सुरेश हुलवान (वय 23 रा खणभाग सांगली) हा हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत फिरत होता. त्याचप्रमाणे शामराव नगर येथे समीर सलीम मुल्ला वय ३२, रा. शामराव नगर, सांगली) मुल्ला हा हातात तलवार घेऊन परिसरात दहशत माजवत होता.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हुलवान व मुल्ला या दोघांना अटक करून त्यांच्याकडील कोयता व तलवार ताब्यात घेतले. निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, सुमित सूर्यवंशी, योगेश सटाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.