सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
सांगली - कवठेमंकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे. या गावामध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत अधिकृत माहिती समजलेली नाही. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. मुंबई पोलिलसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती आहे. गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून येथे मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याचं सांगितलं जात आहं. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
या कारवाईबाबत पोलिसांना मोठी गोपनीयता बाळगली आहे. सांगलीमध्ये यापूर्वीदेखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी केली होती. आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत. त्यामुळे देशभरातील ड्रग्जचं कनेक्शन पुढे आलेलं होतं. यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेलं. आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.