yuva MAharashtra खर्चाचे दरपत्रक ठरले, त्यानुसारच खर्च करा; लोकसभा निवडणुकीसाठी.

खर्चाचे दरपत्रक ठरले, त्यानुसारच खर्च करा; लोकसभा निवडणुकीसाठी.



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी खर्चाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. या दरपत्रकानुसारच उमेदवारांना खर्च करायचा आहे. यामध्ये पुष्पगुच्छ, हारापासून तर पोस्टर, बॅनर, फ्लेक्स, टोपी, दुपट्टा, फेटा, बिल्ले, झेंडे, चहा, नास्ता, जेवण, मेसेज, पाणी तसेच घरोघरी जावून प्रचार करणाऱ्या व्यक्तींच्या प्रति दिवसाच्या दराचा समावेश आहे. तसेच शंभर पेक्षा अधिक वस्तूंचा दर ठरवून दिला आहे. यामध्ये चार चाकी प्रचार वाहनापासून ट्रक व इतर वाहनांचाही समावेश आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरूवात झाली आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उमेदवारांसाठी खर्चाचे दरपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पुष्पगुच्छ, लहान हार प्रति नग ५० रूपये, पुष्प्गुच्छ, हार मोठे १५० रूपये प्रति नग, कापडी ध्वज २० रूपये स्के, फुट, पोस्टर प्रति स्के.फुट ५ रूपये, पाेस्टर फ्लॅक्स प्रति स्के.फुट २५ रूपये, बॅनर, कापडी बॅनर अनुक्रमे २५ व १० रूपये प्रति स्के, फुट, बॅनर कागदी ५ रूपये प्रति स्के.फुट, टोपी ५० रूपये, दुपट्टा ३० रूपये, फेटा १५० रूपये, होर्डींग २०० रूपये चौ.फुट, 


कट आऊट २३० रूपये, बिल्ले, मोठे बिल्ले, पॉम्पलेट, तोरण, पताका, झेंडे, हॅन्ड बिल,व्होटल स्पीप, खुर्ची, टेबल, सोफा, टी पाय, सतरंजी, गादी, चादर, लोड, शामियाना, स्टेज, बॅरीकेट, वुडन पोडीयम, व्हीआयपी खुर्ची, स्पीकर, साऊंड, माईक, एलसीडी, हॅलोजन, कुलर, ट्युबलाईट, मेटल लाईट, हॉटेल विनावातानुकूलीत, हॉटेल वातानुकूलीत, साधे जेवण, मासाहारी जेवण, नास्ता, चहा, कॉफी, दुध, पानी, निवडणूक प्रतिनिधी प्रति व्यक्ती ६०० रूपये, मतदान प्रतिनिधी प्रति व्यक्ती ७०० रूपये, घरोघरी प्रचार प्रति व्यक्ती ६०० रूपये, गाडी चालक, कार्यालय १० हजार रूपये, ढोल, ताशे, संदल, ऑटो रिक्षा, मोटरसायकल, सायकल, स्वागत गेट, बोर्ड, बॅनर व भिंतीवरील जाहिराती, खासगी व शासकीय जागेवरील होर्डींग, टाटा सुमो, बोलेराे, ट्रक, रूग्णवाहिका पासून तर इतर वाहनांचेही दर ठरवून देण्यात आले आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी मोबाईलवर पाठविण्यात येणारे एसएमएस, व्हॉईस एसएमएस, समाज माध्यमांवरील जाहिराती यासाठी दर ठरवून देण्यात आलेले आहे. वाहनांचे महिनेवारी व नियमित दर वगवेगळे ठरवून देण्यात आले आहे.