सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
लोहगाव हजारो कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या समृद्धी महामार्गावरील पुलाला भलेमोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील पुलावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगावनजीक पुलावर अचानक खड्डा पडला आहे. त्यामुळे कामावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
लोहगाव येथील स्मशानभूमीजवळील पुलावर अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. खड्यातील लोखंडी सळखी तुटल्याचे दिसत आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ४ मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे.