yuva MAharashtra अखेर ठरलं, सांगलीतून पै. चंद्रहार पाटीलच ! आता लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे !!

अखेर ठरलं, सांगलीतून पै. चंद्रहार पाटीलच ! आता लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे !!



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
मुंबई - महाआघाडीतील जागांचा तिढा सुटला असून महाआघाडीच्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या शिवसेना व काँग्रेस आपल्या जागा जाहीर करणारा असून राष्ट्रवादी शरद पवार गटही आपल्या जागा जाहीर करणार आहेत.

दरम्यान सांगलीतून ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील हेच उमेदवार असणार आहेत. उद्या पैलवान पाटील यांची उमेदवारी अधिकृत रित्या जाहीर होईल. आता विशाल दादा व काँग्रेसचे नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.