सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
नवी दिल्ली - दिल्लीमधील बैठकीत अखेर महायुतीच्या जागावाटपावर सहमती झाल्याची माहिती मिळत आहे. भाजपला ३४, शिंदेंच्या शिवसेनेला १० तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा दिल्या जातील. महायुतीमध्ये अजूनही १-२ जागांवर तिढा कायम आहे. त्यावर स्थानिक पातळीवर चर्चा करून हे प्रश्न सोडवावेत, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या बारामती, शिरूर, रायगड, परभणी, या जागा जिंकण्याचं अजित पवार यांचं लक्ष्य असणार आहे. गेले काही दिवसात महायुतीच्या जागा वाटपाबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अपेक्षित असलेल्या जागांबाबत इशारा दिला होता.
मात्र भाजपच्या केंद्रीय वरिष्ठांनी या इशाराकडे दुर्लक्ष करीत भाजपा 34 जागा निवडण्यावरच शिक्का मुहूर्त केले असून, मित्र पक्षांना मिळालेल्या जागावर त्यांनी समाधान मानावे असा निर्णय दिला आहे. आता याबाबत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पाटील गट यातील इच्छुकांमध्ये कोणाची वर्णी लागणार आणि कुणाचे तिकीट कापले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.