yuva MAharashtra 'सांगलीत आघाडीला पोषक वातावरण, पायाला भिंगरी बांधून लोकसभेसाठी लढणार.'

'सांगलीत आघाडीला पोषक वातावरण, पायाला भिंगरी बांधून लोकसभेसाठी लढणार.'



सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
पुढे - सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीला पोषक वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. कॉंग्रेससह मित्रपक्ष एकदिलाने निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारीबाबत वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल, असे मत काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी व्यक्त केले.


वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियमित बैठकीसाठी आलेले विशाल पाटील म्हणाले, सांगली परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील दोन पंचवार्षिकला काही अडचणीमुळे ही जागा आमच्या हातून गेली. मात्र आता ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष एकदिलाने या जागेसाठी लढणार आहेत. मी स्वतः मतदारसंघात पायाला भिंगरी बांधून फिरत आहे. यंदाची लोकसभा पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने लढवणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.