yuva MAharashtra वारणालीतील शिक्षिकेचे बंद घर फोडून चोरी

वारणालीतील शिक्षिकेचे बंद घर फोडून चोरी



सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
सांगली - सांगली उपनगर वारणाली येथील अष्टविनायक नगर मधील राजश्री सुरेश घोडके यांचे बंद घर फोडून घरातील सोन्याच्या दागिनेसह २१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री घोडके या आपल्या कुटुंबियांसह वारणाली, अष्टविनायक नगर येथे राहतात. घोडके या मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यानी बंद घराची कडी उचकटून घरात प्रवेश केला व बेडरूम मधून बारा हजार रुपये, व सोन्याचे सहा वेढण, असा सुमारे २१००० रुपये पोबारा केला. ही घटना बुधवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत घोडके यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय नगर ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.