yuva MAharashtra मनोज जरांगें पाटील प्रत्येक मतदारसंघात सर्व जातीचे उमेदवार उभे करणार

मनोज जरांगें पाटील प्रत्येक मतदारसंघात सर्व जातीचे उमेदवार उभे करणार



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
जालना - मराठा आरक्षण  लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील  यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या  बैठकीला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जरांगे यांनी समाजासमोर दोन पर्याय दिले होते. आता राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लिम, दलित या समाजाचाही असू शकतो.

राज्यात 17 ते 18 मतदारंसंघांवर मराठ्यांचं वर्चस्व आहे. मात्र सगळे फॉर्म भरत राहिलात तर मतं विखुरले जातील. त्यातून कुणाचंही साधू शकतं. मुळात आपलं लोकसभेत काही अडलेलं नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून एकच फॉर्म जिल्ह्यातून टाकावा. मुख्यमंत्री शिंदे विनाकारण मराठा समाजाच्या नजरेतून उतरायला लागले आहेत, गरज नसताना लाट अंगावर घेत आहेत. आपलं काम राज्य सरकारशी असल्याने आपण विधानसभा निवडणुकीत सरकारला हिसका दाखवू असे देखील त्यांनी म्हटले.


मराठा-कुणबी एकच असताना ओबीसी आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारला विधानसभेत धडा शिकवायचा आहे. असा निश्चय यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे. जरांगे पाटलांनी यावेळी समाजासमोर दोन पर्याय ठेवले होते. एक होता, सगळ्या पक्षातल्या उमेदवारांना पाठिंबा देऊन त्यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा बाँडवर लिहून घ्यायचा. पण लोकांना हे मान्य नव्हतं. दुसरा मुद्दा होता, प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा. तो उमेदवार सगळ्या जाती-धर्माचा असणार. याला लोकांनी संमती दिली.