Sangli Samachar

The Janshakti News

मोफत विजेसाठी एक कोटी कुटुंबांची नोंदणी



सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
नवी दिल्ली - छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी एक कोटींहून अधिक कुटुंबांनी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत आधीच नोंदणी केलेली आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी याला 'असामान्य घडामोड' संबोधले. योजनेसाठी देशाच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणावर नोंदणी होत आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू व उत्तर प्रदेशमधून ५ लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे, असे मोदींनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे सांगितले. ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.


केंद्राचे अर्थसाहाय्य

या योजनेच्या अंतर्गत दोन किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जाप्रणाली बसविण्यासाठी खर्चाच्या ६० टक्के आणि दोन किलोवॅट ते तीन किलोवॅट क्षमतेदरम्यानच्या प्रणालीसाठी अतिरिक्त खर्चाच्या ४० टक्क्यांपर्यंत केंद्रीय अर्थसाहाय्य मिळेल. हे साहाय्य तीन किलोवॅटपर्यंतसाठी आहे. विद्यमान दर पाहता एक किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रणालीसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी अनुदान ७८ हजार रुपये असेल.