सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
नवी दिल्ली : भारताच्या अग्नि ५ या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी अर्थात 'मिशन दिव्यास्त्र'ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असून ते मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकलद्वारे प्रक्षेपित करण्यात आलं आहे. यासाठी पंतप्रधानांनी ट्विट करत DRDOच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदनही केलं आहे.
सन २०२२ मध्ये भारताच्या सर्वाधिक शक्तीशाली अग्नि ५ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावेळी या क्षेपणास्त्रानं ५५०० किमी अंतरावरील टार्गेट उद्ध्वस्त केलं होतं. या मिसाईलला डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेडनं संयुक्तरित्या बनवलं आहे. भारताच्या या क्षेपणास्त्राची चीनसह इतर देशांना भीती आहे कारण हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असून त्याच्या रेंजमध्ये हे देश येतात.
अग्नि-५ क्षेपणास्त्राची ही आहे खासियत
अग्नी ५ क्षेपणास्त्राचं वजन ५० हजार किलो असून १७.५ मीटर इतकी याची लांबी आहे. त्याचा व्यास २ मीटर म्हणजेच ६.७ फूट असून त्याच्यावर १५०० किग्रँ वजनाचे अण्वस्त्र लावता येऊ शकतात. या क्षेपणास्त्रात तीन स्टेजचे रॉकेट बूस्टर आहेत, जे घन इंधनावर चालतात. याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा २४ टक्के जास्त आहे. म्हणजेच एका सेकंदाच ८.१६ किमीपर्यंत अंतर कापतं.