yuva MAharashtra डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेने महाआघाडीमध्ये ट्विस्ट

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेने महाआघाडीमध्ये ट्विस्ट



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसोबत निवडणक लढणार की नाही, याविषयी ॲड. प्रकाश आंबेडकर भूमिका स्पष्ट करणार आहेत. 'लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपविरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्देवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. त्यामुळे विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार ॲड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार ॲड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.


प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

महाविकास आघाडीविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'महाविकास आघाडी वेगळी आहे. तर संजय राऊत वेगळे आहेत. आम्ही ज्यांना लक्ष्य केलं, ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात. त्यामुळे आम्ही म्हणालो की, संजय राऊत हे आघाडीत बिघाडी करत आहेत'.

महाविकास आघाडीच्या प्रस्ताविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आम्हाला महाविकास आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात अकोला लोकसभा मतदारसंघ होता. तर दोन दुसऱ्या जागा होत्या. यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही'.