yuva MAharashtra कवठेपिरान येथे गांजा विकणाऱ्या तरुणास केली अटक

कवठेपिरान येथे गांजा विकणाऱ्या तरुणास केली अटक



सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
सांगली - मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे खुलेआम गांजा घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीस ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांकडून एक किलो ६०० ग्रॅम गांजा एक तराजू एकूण ३९,६८४ मध्ये माहिती जप्त केला आहे.


सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. विशाल विकास येवले असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक मिरज पूर्व भागात पेट्रोलिंग करत होते, तेव्हा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की, कवठेपिरान येथील चौथाई गल्ली येथे खुल्या गांजा विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी विकास येवले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपासणी केली असता, त्याच्याकडे सदर गांजा सापडला. यावेळी त्याला अटक करण्यात आली व हा गांजा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या पथकातील पो. हे कॉ. मेघराज रुपनर, महेश जाधव, पो. ना. सुशील मस्के, बंडू पवार, रंजीत घारगे, पो. कॉ. हिम्मत शेख, चालक मनोज साळुंखे व श्रीमती प्रियांका बाबर, सुशांत पाटील यांनी केली.