सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
कराड - खानापूर तालुक्यातील विटा येथील पत्रकार अजय सकटे यांना बातमी कां छापली म्हणून एका इसमांकडून धमकी देण्यात आल्याच्या घटनेचा भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषदेच्या वतीने कराड येथे निषेध करण्यात आला.
विटा येथील पत्रकार अजय सकटे यांनी एका सहकारी पतसंस्थेच्या चुकीच्या कार्यपद्धतीची माहिती मिळाल्यानंतर बातमी प्रसिद्ध केली याचा राग मनात धरून एका इस्माकडून त्यांना धमकावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याची विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. या धमकीच्या घटनेचा भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या संघटनेच्या माध्यमातून निषेध करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विश्वास मोहिते होते.
यावेळी खानापूर तालुक्यातील विटा येथील अजय सकटे यांना दिल्या गेलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात आला शिवाय पत्रकार यांच्यावरील हल्ला आणि पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या धमक्या या दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे अशा घटनांची तपास यंत्रणा गतिमान करावी तसेच खटले जल् दगती न्यायालयात चालवावे या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे निवेदन देण्याचे ठरले. यावेळी संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते सातारा, उपाध्यक्ष दिलीप महाजन, सांगली, उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे सांगली, संपतराव मोहिते कराड, परशुराम भगळे सोलापूर, किशोर साठे सातारा सह संघटनाचे पदाधिकारी, पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.