सांगली समाचार - दि. ७ मार्च २०२४
धुळे: राहुल गांधींची न्याय यात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत असून धुळ्यामार्गे ही यात्रा जाणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज धुळे शहरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली. राहुल गांधींची न्याय यात्रा ही धुळे शहरात आल्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या महिला मेळाव्यात राहुल गांधींकडून महिलांसाठी विशेष पाच अशा घोषणा भविष्यकाळासाठी केली जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
भाजपच्या गॅरेंटी शब्दावर बोलताना नाना पाठवले म्हणाले की, भाजपने काँग्रेसचा गॅरेंटी हा शब्द चोरला असून कर्नाटकात झालेल्या निवडणुकीच्या राहुल गांधींनी प्रत्येक भाषणात तेथील मतदारांना दिलेल्या पाच गॅरेंटी पूर्ण करण्यात आली. आमच्या गॅरंटी दिलेल्या शब्द पूर्ण केला जातो. मात्र भाजपाची गॅरेंटी ही जुमलेबाज गॅरेंटी आहे. भाजपाकडून गॅरेंटी या शब्दाचा देखील अपमान केला जात आहे, तसेच आदर्श या शब्दाला देखील याआधी बदनाम केले गेले त्याच्यावर टीका केली गेली. मात्र तोच आदर्श आता त्यांनी त्यांच्या सामावला असल्याचे सांगत अशोक चव्हाणांवर देखील नाना पटोले यांनी यावेळी निशाणा साधला.
भाजपा अत्यंत कमजोर पक्ष असून आमचे लोक त्यांना आयात करावे लागत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेस भरघोस मतांनी विजयी होईल, आमच्याकडे सक्षम उमेदवार देखील असून भाजपा हा कमजोर पक्ष असून ते दुसऱ्यांचे लोक चोरतात अशी घणाघाती टीका देखील नाना पटोले यांनी यावेळी केली. भाजपाने आदर्श चोरून नेला, आदर्श वर डाका टाकला, आदर्शला शिव्या घातल्यात लोकसभेच्या निवडणुकीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेवर देखील पाठवले. या देशात प्रत्येक भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन सत्ता चालवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.
विजयकुमार गावित यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ बाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की आचारसंहिता लागू द्या, आम्हाला चोरी करण्याची गरज नाही किंवा कारखानदारांना पैसे देखील देण्याची गरज नाही. आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार असून माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट आहे, असे सांगून नाना पटोले यांनी येणाऱ्या काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे.