Sangli Samachar

The Janshakti News

शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने महाराष्ट्र लोककला महोत्सव संपन्न



सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
सांगली - येथील शिवलीला सांस्कृतिक कला मंचच्या वतीने विसावा महाराष्ट्र लोककला महोत्सव विष्णुदास भावे नाट्य मंदिर सांगलीच्या रंगमंचावर जल्लोषात पार पडला. महोत्सवाचे व कै. तुकाराम खंडू गरड मिरजकर स्मृती पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन मनोहर काकाजी सारडा, रमाकांत भाऊ घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यासह मान्यवर व पुरस्कार मानकरी यांना वाजत गाजत शोभायात्रेद्वारे रंगमंचावर आणण्यात आले.



या कार्यक्रमात लावणी भारुड गोंधळ पिंगळा वासुदेव पोवाडा जागरण गोंधळ यासह लोककलांचे अनेक कलाप्रकार सादर झाले. पुण्याची लावण्यं अप्सरा स्वाती पुणेकर इचलकरंजीचे रेणके बंधू जागरण गोंधळ पार्टी, कोल्हापूरचा ढोल ताशा रिद्धी ग्रुप, शाहीर आविष्कार देशिंगे, कराडची सुपरफास्ट लावण्यवती अनु खांडेकर, तमाशासम्राज्ञी लंका पाचेगावकर, स्वाती कुंभार, अर्चना निकम, अर्चना कदम, स्वाती कुंभार यांना तुकाराम खंडू गरड मिरजकर स्मृती महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार हा पुरस्कार तर सुनील पिराळे, डॉक्टर विठ्ठल व पद्म मस्के, रेवती कुलकर्णी, उल्हास व उज्वला परब, कलाप्पा सुतार, माया गडदे, संगीता पाटील, यांना कर्तृत्व भरारी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास धनेश भाऊ खोत, सुधाकर नार्वेकर कलावती पवार बाळकृष्ण भगत मधुकर भोसले सुरेश उप्पार आदी मान्यवर व आशा फडणीस संगीता गरड मंजिरी दांडेकर राणी यादवाडे अलका अटल विमल शेट्टी इंदुताई यंदे, संगीता घाटगे, इब्राहिम जमादार बाळासाहेब खोत आयुब ऐनापुरे शिवेंद्र गरड यांच्यासह मंचच्या पदाधिकारी सदस्या, कार्यकर्ते व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्य संयोजक सुरेश गरड यांच्यासह लावण्य अप्सरा स्वाती पुणेकर अनु खांडेकर शाहीर अविष्कार देशिंगे रवी रेणके रिद्धी ढोल ग्रुप यांच्या कलांना रसिकांनी उस्फुर्त दाद दिली. पुण्याच्या स्वाती पुणेकर यांनी हा लोककला महोत्सव गाजवला. रसिक माय बापाने त्यांचे भरभरून कौतुक केले.
दरम्यान मुलांच्या वेशभूषा लोकनृत्य व महिलांच्या वेशभूषा स्पर्धेला ही उदंड प्रतिसाद लाभला सारिका घोरपडे मोहिनी खोत अर्पणा कागले यांनी परीक्षण केले तर वैष्णवी जाधव हिने उत्तम असे सूत्रसंचालन केले.