सांगली समाचार- दि. २८ मार्च २०२४
सांगली - सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ आणि उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी दोघाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, पंडित पाटील आणि स्मृती पाटील यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवार २६ मार्च २०२४ रोजी कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडे अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि कोल्हापूर मनपाच्या उपआयुक्त शिल्पा दरेकर यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. आज नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपआयुक्त शिल्पा दरेकर यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली. यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते. यानंतर नवनियुक्त अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.