सांगली समाचार - ७ दि. मार्च २०२४
सांगली- जागतिक महिला दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हातर्फे सांगली शहर कुपवाड शहर आणि मिरज शहर या तीनही ठिकाणी भव्य हळदीकुंकू आणि मोनिका करंदीकर प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेतारिका मोनालिसा बागल उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर मिरज मध्ये होणाऱ्या मेगा फायनल साठी खास मराठी अभिनेता नितीश चव्हाण (आज्या) उपस्थित राहणार आहे.
अशी माहिती महिला शहरजिल्हाध्यक्षा सौ संगीता हारगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, सदर कार्यक्रमासाठी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज ,युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार ,विधानसभा क्षेत्रअध्यक्ष सचिन जगदाळे व अल्पसंख्याक सेल चे शहजिल्हाध्यक्ष आयुब बारगिर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेमधील तीनही शहरातील पहिल्या ५० विजेत्या महिलांना मिरज येथे रविवार दिनांक १० मार्च रोजी होणाऱ्या महास्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळेल. महास्पर्धेमधील विजेत्या महिलांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पैलवान राहुल दादा पवार यांच्याकडून नवीन इलेक्ट्रिक TVS iQUBE गाडी बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
या पत्रकार बैठकीस नगरसेविका पवित्रा केरीपाळे, विधानसभा क्षेत्र अध्यक्षा छाया जाधव, शहर अध्यक्ष स्वाती शिरूर , मिरज शहराध्यक्ष शारदा माळी, अनिता पांगम, संगीता जाधव, वैशाली धुमाळ, रईसा चिंचणीकर, मंजुश्री कांबळे, शीतल सोनवणे, प्रियांका विचारे, लीना कांबळे, प्रियांका तांबडे, निशा गवाळे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष आयुब बारगिर व प्रमुख सचिव डॉ. शुभम जाधव आदी उपस्थित होते.