yuva MAharashtra अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार

अजित पवार गटाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
मुंबई - घड्याळ चिन्हाचा तसेच शरद पवार यांचे छायाचित्र वापर न करण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार) होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी केली.
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ हे वापरण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला सशर्त परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ चिन्ह वापरताना त्या ठिकाणी या चिन्हासंदर्भातील प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा उल्लेख करावा, तसेच शरद पवार यांचे छायाचित्र वापरू नये, असे निर्देश दिले आहेत. परंतु या निर्देशांचे पालन या पक्षातर्फे होत नसल्याचे आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे. संबंधित पक्षाला यासंदर्भात सूचना द्याव्या किंवा कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे.