Sangli Samachar

The Janshakti News

मराठा समाजाने खरंच सभेकडे पाठ फिरवली का? खुद्द मनोज जरांगे काय म्हणाले ?



सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
करमाळा - मनोज जरांगे पाटील यांच्या करमाळ्यातील सभेला मराठा समाजाने पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाणमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण सभेला गर्दी न झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी खंत व्यक्त केली.

'असं मोकळं ग्राऊंड दिसलं की चव जाते. लोकांमध्ये गैरसमज जातात. पसरवणारेही गैरसमज पसरवतात. बैठक असो किंवा सभा असो ग्राऊंड भरलं नाही असं झालंच नाही. गावाची बैठक अशी पटांगणात डोंगरात घेतल्यासारखी घेतली तर तिथे कितीही लोक आले तरी कमीच दिसणार आहेत', असं जरांगे पाटील म्हणाले.


त्यामुळे याचा मराठा आंदोलनातील धग कमी होते का ? मनोज रंगे पाटील यांची बदलती भूमिका समाजाला मान्य नाही का ? की गर्दी कमी होण्यामागे आणखी काही कारण आहे, विचार जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी करायला हवा.