yuva MAharashtra जान्हवीज मल्टी फाउंडेशन चे शिल्पकार डॉ राजकुमार कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न...

जान्हवीज मल्टी फाउंडेशन चे शिल्पकार डॉ राजकुमार कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न...



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
डोंबिवली (विद्या कुलकर्णी) - पूर्वाश्रमापासून चालत आलेली गुरुकुल शिक्षणपद्धती चा आजच्या पिढीला फारसे माहिती नाही. हीच माहिती आणि हाच अनुभव मुलांना समजण्यासाठी दरवर्षी २१ मार्च रोजी, शिक्षण महर्षी डॉ राजकुमार कोल्हे यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून जे एम एफ प्रांगणात हा दिवस ' गुरुकुल दिवस ' म्हणून साजरा केला जातो.ह्या वर्षी देखील गुरुकुल पद्धतीने सर्व मुले पांढरा रंगाचा पोशाख परिधान करून लवकर सकाळी शाळेत आली होती. गुरुकुल मधे ऋषी मुनी ज्ञान देत असत ,राजवी मोरे अनुसया तर अत्री ऋषी निजू संत्रा व रूद्र पटेल संदी पनी ऋषी बनून आले होते.डॉ कोल्हे यांचे आगमन होताच सर्व मुलांनी लेझिम , ढोल ताशे,फुलांचा वर्षाव करत जल्लोषात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
     सरस्वती पूजन करून गुरुकुल पद्धतीने प्रार्थना, योगा, ध्यानधारणा, करून संबधित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन केले. गुरुकुल शिक्षणपद्धती मधे अध्यापन बरोबरच इतर कलाही शिकवल्या जातात त्याच प्रमाणे संगीत शिकवण्यासाठी व ऐकवण्यासाठी दीव्यांग कलाकारांचा समूहाला आमंत्रित करण्यात आले होते.श्री. श्रवण कुमार व त्यांचा वाद्यवृंद ह्यांनी मुलांच्या आवडीची गाणी गाऊन मुलांना आनंद दिला त्याचबरोबर मुलांनी सुध्धा गाणं गात असताना नृत्य करून सर्वांनाच आनंद दिला.सर्व मुलांची फळांचा केक कापून तो खाण्याचा ही आनंद घेतला.


    गुरूंचा महिमा अगाध आहे, गुरुविण कोण दाखवी वाट ..प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू असावा तर च आपण ज्ञानाच्या महासागरातून ज्ञानाचे मोती वेचून घेऊ ,असे सांगून संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी मुलांना समुपदेशन केले.
       सायंकाळी 'ब्रह्मा रंग तालय' मधे संपूर्ण जे एम एफ परिवाराने एक आगळा वेगळा कार्यक्रम डॉ राजकुमार कोल्हे यांच्या वाढदिसानिमित्त आयोजित केला होता. डॉ राजकुमार कोल्हे यांचे स्वागत त्यांच्या सुविद्य पत्नी आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे तसेच त्यांचे कन्यारत्न खजिनदार व दिग्दर्शिका कु .जान्हवी कोल्हे यांच्या समवेत फुलांच्या पायघड्या घालून आगमन झाले.हजारो लोकांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. उपस्थित पाहुणे पै, तसेच डॉ प्रेरणा कोल्हे यांचे माता पिता श्री.परशुराम जी भांगे व सौ पुष्पा भांगे यांनी डॉ कोल्हे यांचे औक्षण केले.नगरसेवक श्री विश्वनाथ राणे ; साम टीव्ही चे पत्रकार, तसेच गायत्री परिवाराच्या संध्या पाटील, डॉ मोजेस, व अनेक मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
        वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या विनया नायर यांनी स्वागत नृत्य करून कार्यक्रमाची सुरुवात केली.पाहुण्यांचे स्वागत झाल्यावर सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी स्वरचित काव्य वाचून डॉ कोल्हे यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या, तर कन्या जान्हवी कोल्हे यांनी त्यांचा वडिलांबरोबरचा लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतचे भावनिक नात्याची गुंफण कशी होती आणि आहे त्या भावना व्यक्त केल्या. डॉ राजकुमार कोल्हे यांचे कनिष्ठ बंधू श्रीयुत युवराज कोल्हे यांनी देखील स्वरचित कविता सादर केली.
     "देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याने ,देणाऱ्याचे हात घ्यावे..." कायमच दुसऱ्यांच्या हिताचा विचार करणारे डॉ राजकुमार कोल्हे यांनी वाढदिवसानिमित्त एक कल्पना साकारली व ती अस्तित्वात आणली.ती म्हणजे..." देवाचे दुसरे घर.." .ज्याने दिल्यात चोची,देईल तोची चारा.आई वडिलांचे हरपलेले छत्र असणारे अनेकजण आहेत.परंतु दैवी अंश असलेले लोक अजूनही ह्या जगात आहेत त्यामधील असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ राजकुमार कोल्हे व मायेने जवळ घेणाऱ्या डॉ प्रेरणा कोल्हे.
        मातृ पितृ चे छत्र हरपलेले मुलांसाठी जे एम एफ चे फाउंडेशन चे सर्वेसर्वा डॉ राजकुमार कोल्हे व सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी त्या मुलांचा पालनपोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेतली आहे. कर्म आणि धर्म ह्यांची सांगड घालून डॉ श्री व सौ कोल्हे ह्यांनी अशा मुलांचे पालकत्व स्वीकारले. अमन सोलंकी, नेहा शिंदे व निखिल शिंदे हे बहीण भाऊ यांचे लहानपणीच छत्र हरपले,असे व अनेक मुलांचे पालकत्व कोल्हे दांपत्याने स्वीकारले आहे. जे एम एफ हा फक्त परिवार नसून एक भावनिक गुंतवणूक आहे. ह्या मुलांचे पालकत्व स्वीकारणे ही दैवी योजनाच असावी असे भावनिक उद्गार डॉ कोल्हे यांनी काढले तर ' ईश्वराच्या दैव हाती,तोच जोडतो नाती गोती ' ..असे सांगून डॉ प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना जवळ केले.सर्वच उपस्थित कोल्हे दपत्यांच्या ह्या उपक्रमाने कृतकृत्य झाले.
   शिशु विहारच्या सर्व शिक्षकांनी कलात्मक असा फळांचा केक बनवला व श्रीयुत प्रशांत पाठक गुरूजींनी वेद मंत्र म्हणुन पाच सुवासिनींनी डॉ राजकुमार कोल्हे यांना वाढदिवसाचे औक्षण केले व केक कापला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी च मेजवानीचा आस्वाद घेतला.संपूर्ण सूत्रसंचालन सौ श्रेया कुलकर्णी यांनी केले