yuva MAharashtra ठाकरे आणि राऊतांच्या विरोधात भाजपची तक्रार

ठाकरे आणि राऊतांच्या विरोधात भाजपची तक्रार



सांगली समाचार  - दि. २७ मार्च २०२४
मुंबई  - शिवसेना (उबाठा) गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. भाजपच्या या तक्रारीत राऊत आणि ठाकरेंवर कारवाईची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उबाठा-गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या बुलढाणा येथील जाहीर सभेत केलेल्या विधानाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी देखील भाजपने केली आहे. आयोगाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती भाजपतर्फे करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत विरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असे भाजपच्या पत्रात नमूद करण्यात आलेय. 


यासोबतच भाजपने आपल्या पत्रात आयोगावर दुटप्पी वागणुकीचा आरोप लावला आहे. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया पोस्ट किंवा भाजपने निरिक्षत केलेल्या भाषणांकडे डोळेझाक केल्याची उदाहरणे भरपूर आहेत. मात्र निवडणूक आयोग भाजप सदस्यांवर कारवाई करण्यात अवाजवी घाई दाखवतो, कधी कधी औपचारिक तक्रारी नसतानाही कारवाई करण्यात येते असा आरोप भाजपने केला आहे.