Sangli Samachar

The Janshakti News

वीस रुपयांची नाणी गेली कुठे?



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
नवी दिल्ली - २०२० मध्ये तयार झालेले वीस रुपयांचे नाणे चार वर्षे उलटले, तरी दुर्मिळ झालेले दिसत आहे. या नाण्याविषयी ग्रामीण भागात उत्सुकता, कुतूहल आहे. परंतु, ते कुठे दिसेनासे झाले आहे. मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथील टाकसाळींमध्ये वीस रुपयांचे नाणे तयार झाले. ८ मार्च २०१९ मध्ये नाण्यांची सिरीज जारी करण्यात आली होती. बेलापूर (मुंबई) येथील बॅंकेतून देशभरात ती वितरित केली जातात.

नाण्याची वैशिष्ट्ये

  • नाण्याला बारा कोन

  • ८.५४ ग्रॅम वजन

  • हलके व टिकाऊ

  • २७ एमएम व्यास, त्यात दोन रिंग

  • वरच्या रिंगमध्ये ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक व २० टक्के निकेल

  • दुसऱ्या रिंगमध्ये ७५ टक्के कॉपर, २० टक्के झिंक व ५ टक्के निकेल

  • स्पर्शाने सहज ओळखता येते, दृष्टिहीनांसाठी उपयुक्त

  • नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंहाची मुद्रा

  • दोन्ही बाजूला हिंदीतून भारत व इंग्रजीतून इंडिया, त्याखाली सत्यमेव जयते

  • दुसऱ्या बाजूस पाने किंवा पाण्याचे थेंब हे हिरव्या शेतीविषयक प्रतीक


तयार झाल्यापासून एक ते दोनवेळाच वीस रुपयांचे नाणे आमच्याकडे आले. अनेकजण ते पाहण्यासाठी येतात, कुतूहलाने पाहतात. इतर नोटा किंवा दहा रुपयांच्या नाण्यांसारखे या नाण्याचा वापर होताना दिसत नाही.