Sangli Samachar

The Janshakti News

डोंबिवलीतील म्हात्रे नगर येथे प्रथमच महिलांनी केले होलिका दहन...



सांगली समाचार - दि. २६ मार्च २०२४
डोंबिवली ( विद्या कुलकर्णी ) - डोंबिवलीत सर्व ठिकाणी होळीचा सण अतिशय उत्साहात साजरा होतो. असाच यावर्षी एक आगळ्या वेगळ्या स्वरूपात येथे सौ. गायत्री जितेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच डोंबिवली पूर्वेतील म्हात्रे नगर येथे महिलांच्या हस्ते होलीका दहन करण्यात आले. अतिशय उत्साहात हा होळीचा सण साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रचंड गर्दी भगिनींचीच होती. भगिनींच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. 

या कार्यक्रमात स्पर्धांची तसेच कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी सौ. गायत्री जितेश पेडणेकर यांच्या सदाबहार मार्गदर्शनात महिलांसाठी आणि लहान मुले व मुलींसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी  मुलांनी तसेच भगिनींनी खूप मजा केली. 


आपल्या या महाराष्ट्रात होळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु यावर्षी डोंबिवलीतील  म्हात्रे नगर येथे हाच होळीचा सण विशेष महिलांसाठी साजरा करण्यात आला. तेव्हा होलीका दहन हे महिलांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या हस्ते अनेक विभागातील भगिनींचा सत्कार करण्यात आला.तसेच लहान मुलींचा व मुलांचाही सत्कार करण्यात आला व त्यांना बक्षिसे ही देण्यात आली. त्यावेळी या बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक महिलांची मंडळे व अनेक महिला या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना महिला म्हणाल्या की आमच्यासाठी आता एक नवे दालन खुले झालेली आहे. 

हा एक आगळा वेगळा उपक्रमच म्हणावा लागेल त्याची कल्पना सौ.गायत्री जितेश पेडणेकर यांची होती त्यावेळी साऱ्या महिलांनी त्यांचे आभार मानले. असेच अनेक कार्यक्रम महिलांसाठी सौ.गायत्री जितेश पेडणेकर यांनी राबवावे व व वेगवेगळ्या स्तरातील महिलांतील सुप्त कलागुणांना अशा कार्यक्रमांमुळे वाव मिळतो हे सांगितले. येथे हजर असणाऱ्या सगळ्या महिलांनी सौ. गायत्री जितेश पेडणेकर यांचे खूप कौतुक केले.