yuva MAharashtra जाणून घ्या सोशल मीडियावर कुठला पक्ष प्रचारावर किती करतो खर्च ?

जाणून घ्या सोशल मीडियावर कुठला पक्ष प्रचारावर किती करतो खर्च ?



सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकशाही देशात निवडणूक कोणतीही असून दे जनतेच्या मतांवरच सरकार बनते आणि पडते. निवडणुकीत सर्वात महत्वाचा भाग हा प्रचार असतो. गेल्या काही वर्षात प्रचार करण्याच्या पद्धतीत बदल बघायला मिळाला. पूर्वी नेते मंडळी घरोघरी जाऊन प्रचार करत असत मात्र आता सोशल मीडियामुळे ऑनलाईन प्रचार सर्व पक्षातील नेत्यांकडून केलेला दिसून येतो.

पूर्वी नेते मंडळी घरोघरी जाऊन प्रचार करत असत मात्र आता सोशल मीडियामुळे ऑनलाईन प्रचार सर्व पक्षातील नेत्यांकडून केलेला दिसून येतो. पूर्वी टीव्ही आणि वर्तमानपत्र हे प्रसिद्धीचे सर्वात मोठे माध्यम होते. वृत्तपत्रे २४ तासांतून एकदा छापून लोकांपर्यंत पोहोचतात, तर दूरचित्रवाणी २४ तास बातम्या दाखवतात. पण आता माहिती काही सेकंदात लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि यासाठी सर्वात मोठे माध्यम म्हणजे सोशल मीडिया याच माध्यमांतून आता प्रचार केला जातो. भारतात 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात पहिले प्रचार केला गेला. व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि गुगलसारखे प्लॅटफॉर्म निवडणुकीचे निकाल बदलण्यात महत्त्वापूर्ण ठरले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सोशल मीडियाला सर्वात मोठे शस्त्र बनवले होते. आता लवकरच २०२४ लोकसभा निवडणुक होणार आहे. यादरम्यान जाणून घेऊया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खर्चाची गोळा बेरीज पुढीलप्रमाणे…




गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2019 ते 2023 काळात भाजपने फेसबुकवर प्रचारासाठी 33 कोटी रुपये खर्च केले आहेत.
गेल्या पाच वर्षांत भाजपच्या अधिकृत पेजवर प्रचारासाठी १०.२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यानंतर कूप ॲपवर ७.२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर सोशल मीडियावर भाजपच्या 6 पेजवर सर्वाधिक खर्च करण्यात आला

गेल्या 5 वर्षांत म्हणजे 2019 ते 2023 काळात काँग्रेसने 10.58 कोटी रुपये खर्च केले आहेत. काँग्रेस पक्षाच्या 2 पेजवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आला.

तृणमूल काँग्रेसने 8.04 कोटी रुपये खर्च केले आहेत. तर TMC च्या पेज ‘Banglar Gorbo Mamta’ वर 5.86 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फेसबुकवरील राजकीय पक्षांशी संबंधित 15 पेजेसमध्ये ज्यावर सर्वाधिक पैसा खर्च करण्यात आला.

आप आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधातील अपप्रचारावर खर्च
याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या ‘एक धोखो केजरीवाल ने’ या पेजवर गेल्या ५ वर्षांत ३.१९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पूर्वी या पेजचे नाव ‘पल्टू एक्सप्रेस’ असे होते. याशिवाय ‘उल्ताह चष्मा’ नावाचे एक पेज आहे ज्यामध्ये विरोधी आघाडीचा भाग असलेल्या राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांविरोधात अपप्रचार केला जातो. गेल्या पाच वर्षांत यासाठी १.९३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे


रिपोर्टनुसार भारत हा जगातील सर्वाधिक फेसबुक वापरकर्ते असलेला देश आहे. सध्या ही संख्या 31.5 कोटी आहे. आता या आकडेवारीवरून फेसबुक हे प्रसिद्धीसाठी किती मोठे माध्यम आहे हे आपल्या लक्षात येईल.

भाजप आणि काँग्रेस पक्ष प्रामुख्याने निवडणूक प्रचारावर जास्त पैसा खर्च करतील, तर प्रादेशिक राजकीय पक्षांचे निवडणुकीचे बजेट फारसे नसेल. निवडणूक प्रचारासंदर्भात राजकीय पक्षांची विविध माध्यमांशी चर्चा सुरू आहे. बीसीसीएलचे कार्यकारी संचालक शिवकुमार सुंदरम यांचा अंदाज आहे की केवळ प्रिंट मीडिया, ज्यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींचा समावेश आहे, त्यांना राजकीय पक्षांकडून 300 ते 350 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळतील.