yuva MAharashtra कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त

कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
सांगली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सीमेवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामुळे पाच लाखांची गुटखा तस्करी म्हैसाळ येथे उघडकीस आली. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कर्नाटक सीमेलगत असलेल्या रस्त्यावर ९ तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. यांपैकी कागवाड रस्त्यावरील म्हैसाळ तपासणी नाका महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी २४ तास पोलीसांचा सक्त पहारा असून येणार्‍या सर्व वाहनांची कडकपणे तपासणी केली जात आहे.


तपासणी करत असताना गुरूवारी दुपारी वाहनाची (एमएच १० एक्यू ५३८४) याची झडती घेतली असता बंदी असलेल्या गुटख्याची पोती आढळली. वाहनात पोत्यात भरलेली विमल मसाला, विमल तंबाखू, विमल किंग तंबाखू व किंग तंबाखू असा सुमारे पाच लाखाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी गुटख्यासह वाहन जप्त केले असून अकबर शेख (वय ४५ रा. शंभर फुटी रोड, पाकिजा मस्जिदजवळ सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.