Sangli Samachar

The Janshakti News

ठाकरेंनी शिवतिर्थावर पहिल्यांदाच बदलली भाषणाची सुरुवात



सांगली समाचार दि. १८ मार्च २०२४
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने एकत्र येत मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषणाची सुरुवात बदलेली पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे नेहमी शिवतीर्थावर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, मातांनो म्हणून करतात. मात्र, ही सुरुवात बदल्याने विरोधक हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे.

ठाकरेंनी बदलली भाषणाची सुरुवात

माननीय खरगे साहेब, पवार साहेब, राहुल गांधीजी आणि व्यासपीठावर सर्वच मान्यवर.. आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त, देशप्रेमी माता आणि बंधू-भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पुढे ठाकरे म्हणाले, राहुलजी तुम्ही आपल्या भारत जोडो यात्रेची सांगता मुंबईमध्ये करत आहे, पवार साहेब सांगत होते, हीच ती मुंबई आहे, 1942 साली महात्मा गांधींना इंग्रजांना चलो जाव चा नारा दिला होता. आता तीच वेळ आली आहे. भाजप हा एक फुगा आहे, यात हवा भरण्याचं काम आम्हीच केलं. संपूर्ण देशात 2 खासदार होते, यांच्या फुग्यात हवा भरली होती, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली.


आता तेच आम्हाला विचारताय तुमच्या किती जागा येतील, म्हणे, 400 पार जागा येणार आहे. काय फर्निचरचं दुकान काढलं आहे. काय खुर्च्या बनवत आहात का, आज देशभरात एक सारखीच परिस्थितीत आहे. आम्ही विरोधक आहोत, आम्ही विरोधक आहोत, ते हुकुमशाही विरोधात आहोत, तुम्ही घराणेशाहीवर आरोप करताय, पण मोदींची तुमची खुर्ची आणि तु्म्ही इतकाच तुमचा परिवार आहे, बाकीचे कुठे आहे, असं प्रकाश आंबेडकर जसं सांगताय. यांना 400 पार कशाला पाहिजे, त्यांचे एक मंत्री अनंत कुमार हेगडे जे आहे, तेच म्हणाले होते, भारतीय राज्यघटना बदलली पाहिजे. यासाठी 400 पार पाहिजे. रशियामध्ये निवडणूक सुरू आहे. तिथे कुणीच लढायला तयार नाही. सगळे विरोधक हे तडीपार झाले आहे.तेच आपल्या देशात होत आहे, व्यक्तीची ओळख, ही देश असली पाहिजे, असं होत कामा नये. कोणत्याही व्यक्तीपेक्षा देश मोठा नाही.

आता हे मोदी सरकार जाहिरात करत आहे, देशाचं नाव बदलत आहात का? याआधी एनडीएचं सरकार होतं, अटलजी होते, तेव्हा उत्तम प्रकारे सरकार चालवलं होतं. तेव्हा ममता, जया ललिता सगळेच होते. त्यानंतरही एनडीए चांगली चालत होती. पण त्याही वेळी इंडिया शायनिंग फिल गुड अशी परिस्थिती होती. नंतर हे मोदी आले आता सोबत कुणीच नाही. 2014 पासून एका पक्षाचं सरकार आहे. आता ते विरोधक नाही असं सांगत नाही. कुणीही अमरपट्टा घेऊन येत नाही. ज्यावेळी सगळे लोक एकत्र येतात तेव्हा हुकुमशहाचा अंत होतो. तोडा फोडा असा इतिहास आहे, तो आता हाणून पाडला पाहिजे. तेजस्वी यांनी नारा दिला, आम्ही एक नारा देतो, अब की बार भाजप तडीपार, अशी घोषणा देऊन उद्धव ठाकरे यांनी आपलं भाषण थांबवलं.