yuva MAharashtra १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त

 

सांगली समाचार  - दि. ०१ मार्च २०२४

जयपूर : राजस्थानच्या अजमेरमधील विशेष न्यायालयाने गुरुवारी १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध होण्यासाठी पुरेसे आणि सबळ पुरावे देऊ शकत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

 ८१ वर्षीय टुंडा दहशतवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक असून अन्य दोन आरोपी इरफान आणि हमिदुद्दीन यांना टाडा कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ५ आणि ६ डिसेंबर १९९३ च्या रात्री लखनौ, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि मुंबई शहरांमधील पाच ट्रेन्समध्ये स्फोट घडवून आणण्याचा आरोप टुंडावर होता. बाबरी उद्ध्वस्त झाल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे स्फोट घडवून आणले होते. यात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले होते. ३० सप्टेंबर २०२१ रोजी टुंडासह तीन्ही आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. टुंडाचे वकील शफकुअतुल्लाह सुलतानी यांनी सांगितले की अब्दुल करीम टुंडावरचे कोणतेही आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे सादर करता आले नाहीत.