सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
नवी दिल्ली - भारतीय बँका सामान्यतः आपल्या ग्राहकांना दरमहा मर्यादीत संख्येत एटीएम ट्रांझेक्शन करण्याची सुविधा प्रदान करतात. बँकांद्वारे निर्धारित सीमेनंतर एटीएममधून पैसे काढल्यावर बँका शुल्क घेतात. अनलिमिटेड एटीएम ट्रांझेक्शनची सुविधा देखील बँका देतात. पण यासाठी ग्राहकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँक देखील चार्जेस वसूल करते. SBI चे शुल्क देखील व्यवहाराचे स्वरूप आणि शहराच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजे मेट्रो आणि सामान्य शहरांसाठीचे शुल्क वेगळे आहे. याशिवाय, एसबीआय एटीएम कार्ड धारकाला एसबीआय एटीएम कार्ड वापरून इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.
एटीएम कार्ड चार्जेसविषयी माहिती असणे प्रत्येक बँक ग्राहकासाठी गरजेचे आहे. यामुळे ग्राहक अनावश्यक शुल्कांपासून वाचतो. यासोबतच चार्जेस माहिती असल्यावर पैसे कट झाल्यावर विनाकारण बँक कर्मचाऱ्यांसोबत वाद घालावा लागत नाही. आज आम्ही तुम्हाला एसबीआय एटीएम चार्जेजविषयी सविस्तर सांगणार आहोत.
देशातील सर्वात मोठी बँक, काही अटींसह आपल्या ग्राहकांना आपल्या एटीएमसोबतच इतर बँकांच्या एटीएमवर अमर्यादित मोफत एटीएम ट्रांझेक्शनची सुविधा प्रदान करते. एसबीआय बचत बँक अकाउंटमध्ये 25,000 रुपयांपेक्षा सरासरी मासिक बॅलेन्स ठेवणारे ग्राहक बँकेच्या एटीएम नेटवर्कच्या आत अनलिमिटेड एटीएम ट्रांझेक्शन करु शकतात. तर इतर बँकांच्या एटीएममध्ये ही सुविधा घेण्यासाठी एसबीआय ग्राहकांना 1 लाख रुपये बॅलेन्स ठेवावं लागेल.
एसबीआय अकाउंटमध्ये एक लाख रुपयांपर्यंत मासिक बॅलेन्स ठेवणारे ग्राहक देशातील सहा मेट्रो शहर म्हणजेच मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु आणि हैदराबादमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून 3 फ्री ऑफ कॉस्ट ट्रांझेक्शन करु शकता. तर इतर शहरांत मोफत सहा ट्रांझेक्शन केले जाऊ शकतात.
एसबीआय बँक अकाउंटधारकाने आपल्या अकाउंटमध्ये 25 हजार रुपये मासिक बॅलेन्स ठेवले तर त्याला एसबीआय एटीएममध्ये महिन्यात पाच फ्री ट्रांझेक्शन मिळतील. 25000 पेक्षा जास्त रुपये अकाउंटमध्ये ठेवणाऱ्यांना अनलिमिटेड ट्रांझेक्शनची सुविधा मिळते. एखादा एसबीआय अकाउंट होल्डर इतर बँकांमध्येही अमर्यादित एटीएम ट्रांझेक्शन करु इच्छित असेल तर त्याला मंथली अॅव्हरेज बॅलेन्स एक लाख रुपये ठेवावं लागेल.
एसबीआयने ठरवलेल्या मर्यादेनंतर एखाद्या ग्राहकाने एटीएममधून ट्रांझेक्शन केलं. तर त्याला चार्जेस द्यावे लागतील. तुम्ही एसबीआय व्यतिरिक्त एखाद्या इतर बँकेच्या एटीएमचा वापर केला तर प्रति फायनेंशियल ट्रांझेक्शनवर तुम्हाला 20 रुपये भरावे लागतील. यावर जीएसटी देखील लागेल. अशा प्रकारे एसबीआय एटीएममधून पैसे काढणे किंवा एखादं ट्रांझेक्शन केल्यावर 10 रुपये आणि त्यावर जीएसटी भरावा लागेल.