सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
भारतात अनेक रहस्यमयी गोष्टी पहायला मिळतात. ही रहस्य पाहून संशोधक देखील अचंबित होतात. भारतात असेच एक रहस्यमयी गाव आहे. या गावातून 5 हजार लोक रातोरात गायब झालं. मागील 200 वर्षांपसाून हे गाव ओसाल पडले आहे. अद्याप कोणीही या गावात रहायला आलेले नाही. राजस्थानमध्ये हे गाव आहे. नेमकं काय घडलं? गावातून गायब झालेले 5 हजार लोक गेले कुठे? जाणून घेवूया या मागचे रहस्य.
कुलधारा असे या गावाचे नाव आहे. राजस्थानमधील जैसलमेरपासून 14 किमी अंतरावरहे गाव वसलेले आहे. 1300 साली पालीवाल ब्राह्मण समाजाने सरस्वती नदीच्या काठावर हे गाव वसवले होते. या गावात एकेकाळी मोठी रेलचेल होती. हे गाव खूपच समृद्ध आणि संपन्न होते. मात्र, सध्याच्या स्थितीत लोक या गावाजवळ फिरकायला देखील घाबरतात. 200 वर्षांपासून या गावात लोक वस्ती निर्माण झालेली नाही.
असा आहे कुलधारा गावाचा इतिहास
कुलधारा गाव हे मूळ ब्राह्मणांनी वसवले होते. हे सर्व ब्राम्हण पाली भागातून जैसलमेरला स्थलांतरित होऊन कुलधारा गावात स्थायिक झाले होते. या गावातील पुस्तके आणि साहित्यिक वृत्तांत याबाबतचा संदर्भ देण्यात आला आहे. पाली येथील काधान या ब्राह्मणाने प्रथम या ठिकाणी आपले घर बांधले आणि एक तलाव देखील खोदला. या तलावाला त्याने उधंसर असे नाव दिले. येथील पाली ब्राह्मणांना पालीवाल म्हणत.
एका रात्रीत लोक गायब का झाले?
1800 च्या दशकात, ग्राममंत्री सलीम सिंग यांच्या अंतर्गत एक जहागीर किंवा राज्य असायचे. ग्रामस्थांकडून कर गोळा करुन त्याने लोकांचा विश्वासघात केला. गावकऱ्यांवर लादलेल्या करांमुळे येथील लोक खूप त्रस्त झाले होते. सलीम सिंगला गावातील प्रमुखाची मुलगी आवडली आणि त्याने गावकऱ्यांना धमकी दिली. विरोध करणाऱ्यांकडून तो अधिक कर वसूल करू लागला. आपल्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी प्रमुखासह संपूर्ण गाव रातोरात पळून गेले.
कुलधरा गाव बनले पर्यटन स्थळ
कुलधरा गाव हे सध्या पर्यटन स्थळ बनले आहे. कुलधारा गाव हे आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित पद्धतीने संरक्षित करण्यात आले असून याला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटक येथे फिरू शकतात आणि त्या काळात काय घडले त्याची झलक पाहू शकतात. कुलधारा गाव हे विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेले गाव आहे. या गावात 85 छोट्या वसाहती आहेत. गावातील सर्व लहान मोठी घरं उद्ध्वस्त झाली आहेत. सर्व घरांची पडझड झालेली आहे. या गावात एका देवीचे मंदिर देखील आहे. हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे. मंदिराच्या आत एक शिलालेख आहे. याच्यामुळे पुरातत्वशास्त्रज्ञां गाव आणि तेथील प्राचीन रहिवाशांची माहिती गोळा करण्यात मदत झाली आहे.