Sangli Samachar

The Janshakti News

5 वर्षांसाठी 100 दिवसांचा रोडमॅप द्या - नरेंद्र मोदी



सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने देशातील सात टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुका तसेच विधानसभा आणि पोटनिवडणुकांचे मॅरेथॉन वेळापत्रक जाहीर केलेय. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील पाच वर्षांसाठी 100 दिवसांचा रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.

नवी दिल्लीत आज सकाळी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली.यावेळी त्यांनी मंत्र्यांना आपापल्या मंत्रालयातील सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेण्यास सांगितले. तसेच नवीन सरकारचे पहिले 100 दिवस आणि पुढील 5 वर्षांचा अजेंडा अधिक चांगल्या प्रकारे कसा राबवता येईल यावर चर्चा करण्यास सांगितले.


मंत्रिमंडळाने निवडणूक आयोगाच्या शिफारसी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवून 7 टप्प्यातील संसदीय निवडणुकांच्या तारखा अधिसूचित करण्याची प्रक्रियाही सुरू केली.पहिल्या टप्प्यात 102 जागांवर 19 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याची माहिती आहे.यासाठी पहिली अधिसूचना 20 मार्च रोजी जारी केली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएसाठी '400 पार' आणि एकट्या भाजपसाठी 370+ हे लक्ष्य ठेवून नरेंद्र मोदींनी आता विकसित भारत रोडमॅपवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी देशवासियांना एक पत्र जारी करून 2047 पर्यंत विकसित भारतासाठी कल्पना आणि सूचना मागवल्या आहेत.