पंतप्रधान मोदी आणि बिल गेट्स यांनी भारतातील डिजिटल पेमेंट आणि देशाबाहेर त्याचा विस्तार याबद्दलही चर्चा केली. पीएम मोदी आणि बिल गेट्स यांनी भारतातील डिजिटल क्रांतीबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, इंडोनेशियातील G20 शिखर परिषदेदरम्यान जगभरातील प्रतिनिधी भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल जाणून उत्सुक होते.
डिजिटल शिक्षण प्रत्येक गावात पोहोचवणार -
प्रत्येक मुलाला, प्रत्येक गावात डिजिटल शिक्षण देणे हे आपल्या सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आम्ही भारताचे ग्रामीण आणि शहरी असे डिजिटल विभाजन होऊ देणार नाही, डिजिटल पायाभूत सुविधा खेड्यापाड्यात घेऊन जात आहोत.
बिल गेट्स यांच्या सोबतच्या या संवादात पीएम मोदी म्हणाले की, आपल्या सरकारचे लक्ष्य 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे आहे. याशिवाय त्यांना शेतीसारख्या महत्त्वाच्या व्यवसायाचे आधुनिकीकरण करायचे आहे.