सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक केल्यानंतर माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यांना मोठं ग्लॅमरही वेगवेगळ्या बातम्यांमधून मिळालं होतं. आता ते पुन्हा लाईमलाईटमध्ये आले आहेत. याचे कारण ड्रामा क्वीन राखी सावंत. या सगळ्यात समीर वानखेडे यांनी राखीच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांनी राखी आणि वकील अली कासिफ खान यांच्याविरोधात विरोधात अकरा लाखांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. समीर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, राखी आणि कासिफ यांनी आपली बदनामी केली. आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असेही म्हटले आहे.
वकील कासिफ यांच्याबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी यापूर्वी आर्यन खान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुनमुन धमेच्या बाजुनं कोर्टात बाजू मांडली होती. काशिफ यांनी सोशल मीडियावरुन आपली प्रतिमा मलीन करुन अपमान केला आहे. असे म्हणत वानखेडे यांनी मुंबईतील दिंडोशी येथील सिव्हील कोर्टात याचिका दाखल केली आहे.
काशिफ काय म्हणाले...
समीर यांनी आपल्या याचिकेतून वकील कासिफ आणि राखीयांना समज देत यापुढील काळात त्यांनी आपल्याला कोणत्याही प्रकारे त्रास देणे आणि आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करु नये असे म्हटले आहे.
या सगळ्या प्रकरणावर वकील कासिफ यांनी म्हटले आहे की, लोकांच्या भल्यासाठी जर खरं बोललं किंवा काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या तर लगेच मानहानी होते असं कुठं कायद्यात म्हटले आहे? आयपीसी ४९९ काय सांगतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक ठिकाणच्या व्यवहाराविषयी या कलमामधून सांगण्यात आले आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आम्ही देखील जशास तसं उत्तर देणार आहोत.
जर माझी बाजू चूकीची असेल आणि त्यांनी ते न्यायालयाला पटवून दिले तर मी त्यांनी सांगितलेले पैसे नक्की देईन. या सगळ्यात राखीच्या बाजूनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. राखीनं एका व्हिडिओतून आर्यन खानच्याबाबत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली होती. तिनं आर्यन खानला तातडीनं तुरुंगातून सोडून द्यावे, असे म्हटले होते. केवळ राखीच नाही तर त्यावेळी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे शाहरुखच्या पाठीशी उभे राहिले होते.