yuva MAharashtra या महिन्यात जाहीर होणार 10 वीचा निकाल; कुठे, कसा बघायचा? पाहा

या महिन्यात जाहीर होणार 10 वीचा निकाल; कुठे, कसा बघायचा? पाहा



सांगली समाचार  - दि. २८ मार्च २०२४
मुंबई  - महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता 10 च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. बोर्डाकडून  10 वी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते त्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर पाहू शकतील. तसेच एसएससी बोर्डाचा 10वी 2024 चा निकाल पाहण्यासाठी थेट लिंक देखील उपलब्ध केली जाणार आहे.


मार्चमध्ये पार पडली 10 वीची परीक्षा

महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा सकाळी 11 ते 2:10 आणि दुपारी 3 ते 6:10 या वेळेत घेण्यात आली. आता विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 10 वी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी बोर्डाकडून लवकरच सुरू केली जाणार आहे.



निकाल जूनमध्ये प्रसिद्ध होईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, यासंदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर या सोप्या स्टेप्समध्ये त्यांचे रिझल्ट डाउनलोड करता येतील.

महाराष्ट्र एसएससीचा असा चेक करा निकाल

  • SSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर SSC 10 वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  • येथे तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • आता विद्यार्थी त्यांचा रिझल्ट डाउनलोड करू शकतात.

Maharashtra SSC 10th Result 2024: गेल्या वर्षीचा निकाल

गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावी 2023 चा निकाल 2 जूनला जाहीर झाला होता. या परीक्षेसाठी एकूण 15.49 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी 15.29 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि 14.34 लाख विद्यार्थी पास झाले होते. अधिक माहितीसाठी तुम्ही बोर्डाची अधिकृत वेबसाईट पाहू शकता.