सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
मुंबई - पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे गाडीचं एव्हरेज, मायलेज वाढलं तर किती चांगलं होईल, असं अनेकांना वाटतं. एका व्यक्तीने असाच जबरदस्त जुगाड शोधल्याचा दावा केला आहे. त्याने याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फक्त एक लीटर पेट्रोलमध्ये बाईक 90 किमीपेक्षाही जास्त मायलेज देईल असा दावा या व्यक्तीने केला आहे.
साधारणपणे एक बाईक 30 किमीची एव्हरेज देते, पण ही एव्हरेज 90 किमीपर्यंत गेली तर... फक्त एक लीटर पेट्रोल आणि कित्येक दिवस टेन्शनच नाही, हे एखाद्या स्वप्नासारखं वाटेल, पण ते प्रत्यक्षात शक्य आहे हे एका व्यक्तीनं दाखवलं. एका व्यक्तीने आपल्या बाईकसह केलेल्या जुगाडाचा व्हिडिओ शेअर केला आहे. बापू जमीनदार शॉर्ट्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
काय केला जुगाड?
व्यक्ती दावा करत आहे की तो फक्त एक लहान डिव्हाइस बाइकच्या दोन टोकांना जोडू शकतो. त्यानंतर एक लीटर पेट्रोलवर बाईक 90 किलोमीटरपर्यंत सहज धावेल. बाईकची सरासरी तर वाढेलच, पण बाईकमधून धूर निघणंही थांबेल. या उपकरणाच्या मदतीने तो गावातल्या कोणत्याही बाइकची सरासरी वाढवू शकतो, असा दावाही या व्यक्तीने केला आहे.